
“ अहिल्याबाईंना प्राण्यांची खूप आवड होती, हे कळाल्यावर मला खूप आनंद झाला. त्यामुळे त्यांचे व माझे खूप घट्ट नाते असल्यासारखे वाटले. त्यांच्या या आवडीसोबत माझी आवड खूप मिळतीजुळती आहे. माझ्या आईने तर अहिल्याबाई आणि माझ्यामधील समान असलेल्या आणखी काही गोष्टी दाखवल्या. मी त्यांच्याबद्दल खूप प्रश्न विचारत असते, त्यांच्यासारखंच शिकण्याची माझी इच्छा आहे. त्या सर्वार्थाने असामान्य व्यक्ती होत्या. ऐतिहासिक अशा अहिल्याबाई होळकरांचे चरित्र पडद्यावर साकारणे हा खरोखरच माझ्यासाठी सन्मान आहे. ”
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत अहिल्याबाई होळकरांचा प्रवास साकारण्यात आला आहे. पितृसत्ताक समाजातील रुढींवर मात करणाऱ्या अहिल्याबाईंना त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांचा भक्कम पाठिंबा होता.
अहिल्याबाई होळकर या अनेक अर्थाने एक महान व्यक्ती होत्या. त्या खूप मोठ्या योद्ध्या आणि दूरद्रष्ट्या होत्या. त्या दयाळू आणि प्रेमळही होत्या. अनेकांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे, अहिल्याबाई होळकरांना प्राणी खूप आवडत असत. त्या त्यांची खूप काळजी घेत. अहिल्याबाईंच्या स्वभावातील ज्या गोष्टी आतापर्यंत सामान्यांना माहिती नाहीत, त्यावर प्रकाश टाकण्याचा या मालिकेचा उद्देश आहे. विशेष म्हणजे, अहिल्याबाई होळकरांचे पात्र साकारणारी अदिती जलतरे हिदेखील प्राणीप्रेमी आहे. चित्रीकरणादरम्यानदेखील, अदिती सेटवरील प्राण्यांसोबत खेळत असते. घरून आणलेले अन्न प्राण्यांना खाऊ घालत असते.
View this post on Instagram
प्राण्यांवरील प्रेमाबद्दल बोलताना अदिती जलतरे म्हणाली, “ अहिल्याबाईंना प्राण्यांची खूप आवड होती, हे कळाल्यावर मला खूप आनंद झाला. त्यामुळे त्यांचे व माझे खूप घट्ट नाते असल्यासारखे वाटले. त्यांच्या या आवडीसोबत माझी आवड खूप मिळतीजुळती आहे. माझ्या आईने तर अहिल्याबाई आणि माझ्यामधील समान असलेल्या आणखी काही गोष्टी दाखवल्या. मी त्यांच्याबद्दल खूप प्रश्न विचारत असते, त्यांच्यासारखंच शिकण्याची माझी इच्छा आहे. त्या सर्वार्थाने असामान्य व्यक्ती होत्या. ऐतिहासिक अशा अहिल्याबाई होळकरांचे चरित्र पडद्यावर साकारणे हा खरोखरच माझ्यासाठी सन्मान आहे. ”
View this post on Instagram
अदिती जलतरेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या भूमिकेत पहा, दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.३० वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर.
View this post on Instagram