aaditya narayn, neha kakar

इंडियन आयडलचे १२ वे पर्व सुरु झाले आहे. नुकताच या शोच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण हा परिक्षक नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमियासोबत मजामस्ती करताना दिसतो. दरम्यान आदित्य नेहाला, ‘तिला माझं सुख बघवत नाही’ असे बोलताना दिसत आहे.

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदित्य नेहाशी बोलत असतो. ‘मी माझ्या लग्नात बोलावले होते पण तिला माझं सुख बघवत नाही. जळकी परिक्षक नेहा कक्कर’ असे आदित्य बोलतो. आदित्यचे बोलणे ऐकून नेहा, विशाल आणि हिमेशला हसू अनावर होतं.

आदित्यच बोलणे ऐकून नेहादेखील आदित्यला ‘हा. तू माझ्या लग्नात कुठे होतास? आला नाहीस. तू आलास का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर आदित्यने शाहरुख खानच्या स्टाइलमध्ये उत्तर दिले आहे. ‘जसं की शाहरुखने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटात म्हटले होते.. मैं नहीं आऊंगा’ असे आदित्य मजेशीर अंदाजात बोलताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.