adityanarayan

बॉलिवूड सिंगर आदित्य नारायण आणि अभिनेत्री श्वेता अग्रवाल हे दोघं लग्न बंधनात अडकले आहेत. या दोघांनी मंदिरात लग्न केलय. कोरोनाच्या या काळात ५० हून अधिक लोकांना परवानगी नसल्यामुळे कमी लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

बॉलिवूड सिंगर आदित्य नारायण आणि अभिनेत्री श्वेता अग्रवाल हे दोघं लग्न बंधनात अडकले आहेत. या दोघांनी मंदिरात लग्न केलय. कोरोनाच्या या काळात ५० हून अधिक लोकांना परवानगी नसल्यामुळे कमी लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत हे दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती.

 

उदित नारायण यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, माझ्या मुलाचं लग्न एका मंदिरात झालं. ज्यामध्ये केवळ जवळच्या लोकांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. तर लग्नानंतर होणाऱ्या रिसेप्शनमध्ये अनेक लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन,शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र,रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि माधुरी दीक्षित यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पण कोरोनाच्या काळात कोण कोण रिसेप्शनला हजेरी लावतील हे सांगू शकत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

आदित्य आणि श्वेता अग्रवाल १० वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघही सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. ते कामय आपले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. आदित्य नारायण, श्वेता अग्रवाल यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.