aishwarya and farah khan

 ‘मोहब्बते’(mohabbatein) या चित्रपटाला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने कोरिओग्राफर फराह खानने या चित्रपटाबाबत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. फराह खानने(farah khan) ऐश्वर्या(aishwarya) एक प्रोफेशनल अभिनेत्री असल्याचे म्हटले आहे.

‘मोहब्बते’(mohabbatein) या चित्रपटाला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने कोरिओग्राफर फराह खानने या चित्रपटाबाबत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. फराह खानने(farah khan) ऐश्वर्या(aishwarya) एक प्रोफेशनल अभिनेत्री असल्याचे म्हटले आहे. कोणतीही तक्रार न करता ती मोहब्बते चित्रटाचे चित्रीकरण करत होती असेही फरार खानने सांगितले.

फराह खान म्हणाली की,‘ऐश्वर्या एक प्रोफेशनल अभिनेत्री आहे. तिने पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये लंडनमध्ये थंडीत चित्रीकरण केले पण कधीही तक्रार देखील केली नाही. चित्रपटातली तिची आणि शाहरुखची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. आम्ही लंडनमध्ये चित्रीकरण केले. तिकडे पावसात  भिजलो, कडाक्याच्या थंडीत चित्रीकरण केले. दोन गाण्यांच्या चित्रीकरणासाठी आम्हाला न्यूझीलंडला जावे लागले.”