आमिर खान नंतर आणखी एका ‘३ इडियट्स’ मधील अभिनेत्याला कोरोनाची लागण, सिनेमाचं पोस्टर शेअर करत दिली माहिती!

३ इडियट्सचा फोटो ट्वीट करत आणि ऑल इज वेल सांगत अशा शब्दांत ही बातमी दिली आहे. या सिनेमाचे फॅन्स असणाऱ्यांना माधनने लिहिलेलं ट्वीट कळेल.

  गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना बॉलिवूडमधील अभिनेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. अभिनेता अमिर खान याला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ३ इडियट्स चित्रपटातील त्याचा सहकलाकार असलेल्या आर. माधवन यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

   

  त्याने स्वतःला कोरोना झाल्याची बातमी ट्वीट करत दिली आहे. पण त्याने ३ इडियट्सचा फोटो ट्वीट करत आणि ऑल इज वेल सांगत अशा शब्दांत ही बातमी दिली आहे. या सिनेमाचे फॅन्स असणाऱ्यांना माधनने लिहिलेलं ट्वीट कळेल. सिनेमातल्याच डायलॉग्ज आणि कॅरेक्टर्सचा संदर्भ देत त्यानं Covid positive असल्याचं सांगितलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by R. Madhavan (@actormaddy)

  माधवन लिहितो, ‘फरहानला रॅन्चोला फॉलो करायचं होतं आणि व्हायरस त्यांना फॉलो करत होता. अखेर व्हायरसने त्यांना पकडलंच. सध्या ऑल इज वेल आहे आणि कोरोना लवकरच खड्ड्यात जाईल. आमच्या मागे आता राजू या कोरोनाच्या विळख्यात सापडू नये अशी प्रार्थना करू या. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहेत. लवकरच बरा होईन’ असा मजकूर आर. माधवन याने लिहिला आहे.