kranti redkar and sameer wankhede

सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने हैदराबादहून अटक केली आणि त्याला मुंबईला ट्रान्झिट रिमांडवर आणण्यात आले आहे.

    दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी एनसीबीने सुशांतचा सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. त्याला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सुशांतच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

     

    समीर हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले तेव्हा अनेक तारे-तारकांवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. आता सुशांतच्या रुममेटला अटक केल्यानंतर त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

     

    सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने हैदराबादहून अटक केली आणि त्याला मुंबईला ट्रान्झिट रिमांडवर आणण्यात आले आहे. त्याच्या रिमांडसाठी आज त्याला मुंबईतील स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल. षडयंत्र रचण्यासह एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) कलम 27, 28 आणि 29 अंतर्गत त्याच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.