‘बेल बॉटम’ या चित्रपटानंतर अक्षय पुन्हा एकदा रणजीत तिवारींच्या ‘या’ चित्रपटात झळकणार!

'मिशन सिंड्रेला' असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. लंडनमध्ये ऑगस्टपासून या चित्रपटाचं शूट सुरू करण्याची योजना आहे. हा चित्रपट 'रास्तान' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

    कोव्हीड १९ मुळं रखडलेल्या आगामी चित्रपटांची कामं पूर्ण करण्यात सध्या अक्षय कुमार खूप बिझी आहे. सध्याची परिस्थिती पाहता सगळीकडे अनिश्चिततेचं वातावरण आहे. कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर कधी कोणते निर्बंध लावले जातील हे सांगता येत नाही. याच कारणामुळं अक्षयनं आपले प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा जणू धडाकाच लावला आहे. दुसरीकडं अक्षयच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ‘बेल बॉटम’ या चित्रपटानंतर अक्षय पुन्हा एकदा रणजीत तिवारींच्या चित्रपटात झळकणार आहे.

    ‘मिशन सिंड्रेला’ असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. लंडनमध्ये ऑगस्टपासून या चित्रपटाचं शूट सुरू करण्याची योजना आहे. हा चित्रपट ‘रास्तान’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटासाठी अक्षय पुन्हा खाकी धारण करणार आहे. अक्शन-थ्रिलर असलेला ‘मिशन सिंड्रेला’ लंडनखेरीज युकेमधील काही लोकेशन्सवरही शूट करण्याचा प्लॅन आहे. या चित्रपटात अक्षय एका मोहिमेवरून असणार हे शीर्षकावरून लक्षात येतं. बाल तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करणारं हे मिशन आहे. याखेरीज आणखीही काही चित्रपटांमध्ये अक्षय वेगवेगळ्या मिशनवर असल्याचं पहायला मिळणार आहे.