कोरोनामुक्त झाल्यावर प्रिया बापटने अशी दिली प्रतिक्रीया, VIDEO होतोय तुफान व्हायरल!

डॉक्टरांनी दिलेली सगळी औषध घेतोय आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व सुचनांचे पालन करत आहोत. गेल्या आठवड्याभरात आम्हाला जे कोणी भेटले त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्या.

  मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट फेव्हरेट कपल उमेश कामत आणि प्रिया बापटला कोरोनाची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर ते स्वत:च्या घरात क्वारंटाईन झाले होते. आता मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट कोरोनामुक्त झाली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)

  कोरोनातून मुक्त झाल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट लिहिली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ती गाणे म्हणताना दिसत आहे. ती ऐरणीच्या देवा…हे गाणं म्हणताना दिसतं आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना प्रियाने ‘गो कोरोना गो’ अशी कॅप्शन दिली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)

   

  प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर म्हटले होते-‘दुर्देवाने उमेश आणि माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघेही घरातच विलगीकरणात आहोत. डॉक्टरांनी दिलेली सगळी औषध घेतोय आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व सुचनांचे पालन करत आहोत. गेल्या आठवड्याभरात आम्हाला जे कोणी भेटले त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्या.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)