सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची फॅन पूर्ण कोलमडली, प्रचंड धक्क्यामुळे गेली कोमात – रुग्णालयात उपचार सुरु

सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची एक फॅन कोमात(Siddharth Shukla Fan In partial Coma) गेल्याची माहिती मिळाली आहे. एका डॉक्टरने याबाबत माहिती दिली आहे.

    ‘बिग बॉस’च्या १३ व्या सीझनचा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla Death By Haeart Attack)) हृदयविकाराच्या झटक्याने गुरूवारी निधन झाले. सिद्धार्थच्या निधनामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. चाळीसाव्या वर्षी सिद्धार्थचा मृत्यू झाला या गोष्टीवर अजुनही अनेकांचा विश्वास बसत नाही. सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची एक फॅन कोमात(Siddharth Shukla Fan In partial Coma) गेल्याची माहिती मिळाली आहे. एका डॉक्टरने याबाबत माहिती दिली आहे.

    डॉ. जयेश ठकेरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मित्रांनो, तुमच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी बोला. एकटे राहू नका. सिद्धार्थची एक फॅन वॉशरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कृपया स्वतःची काळजी घ्या… तिच्यासाठी प्रार्थना करा”.


    डॉक्टरांनी पुढे म्हटले आहे की, “जास्त ताणामुळे माणूस असा अंशत: कोमात जाऊ शकतो. मला वाटतं प्रत्येक चाहत्याने आता सावरायला हवं. शांत व्हा, झालेल्या घटनेचा जास्त विचार करणं थांबवावं आणि तुमचं मन विचलित होऊ देऊ नये. हे सोपं नाही, हे मला माहीत आहे. पण स्वतःला जपावं”.

    पोलिसांकडून सिद्धार्थच्या मृत्युची चौकशी सुरू आहे. त्यानुसार सिद्धार्थच्या आईचा जबाब नोंदविण्यात आला. त्यामध्ये रात्रीपर्यंत सिद्धार्थ ठीक होता, रात्री जेवणानंतर तो झोपायला गेला. मात्र सकाळी तो उठलाच नाही, असा जबाब आईने नोंदवला आहे.