दिग्दर्शक अनुराग कश्यपला ह्रदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टीनंतर तब्येतीत सुधारणा

दिग्दर्शक अनुराग कश्यपला(Anuraj Kashyap) ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केल्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याच्या तब्येतीत सुधारणा आहे.

  बॉलिवूडमधील दिग्दर्शक अनुराग कश्यपची(Anurag Kashyap) गेल्या रविवारी तब्येत बिघडली होती. त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका(Heart Attack to anurag kashyap) आल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची अँजिओप्लास्टी केली. आता त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

  अनुराग कश्यपला छातीत दुखत होते. तसेच अंगदुखीचाही त्रास होत होता. डॉक्टरांनी चेकअप केले. लगेच अँजिओप्लास्टी केल्यानंतर समजले की अनुराग कश्यपच्या हृदयात ब्लॉकेज आहेत. त्याला लगेच सर्जरीसाठी दाखल करण्यात आले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)


  मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अनुरागची सर्जरी झाली आहे आणि तो आधीपेक्षा बरा आहे. हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा होते आहे. डॉक्टरांनी अनुरागला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.


  अनुराग कश्यपच्या दोबारा चित्रपटाचे काम सुरु आहे.या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे सध्या काम सुरू आहे.