रोबोटने साईन केला चित्रपट, आता करणार अभिनय, सेक्स आणि स्टंटही!

आतापर्यंत सिनेमांमध्ये वि एफ एस्क (VFX) तंत्रज्ञानाच्या मदतीने युद्ध परिस्थिती किंवा रोबोट चित्रीत केले जातं होते. मात्र आता प्रत्यक्षात रोबोटचं सिनेमामध्ये अभिनय करणार आहेत.

  येत्या काळात हॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांच्या जागी चित्रपटात यंत्रमानव दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिकाधिक प्रगती करणारा असेल. अभिनय क्षेत्रात हॉलिवूडमध्ये तर आधीच यंत्रमानवाच्या पदार्पणाची तयारी सुरु आहे. तुर्कीमध्ये देखील एका यंत्रमानवाने एक सिनेमा साइन केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ay Pera 🪐 (@aypera_official)

  आतापर्यंत सिनेमांमध्ये वि एफ एस्क (VFX) तंत्रज्ञानाच्या मदतीने युद्ध परिस्थिती किंवा रोबोट चित्रीत केले जातं होते. मात्र आता प्रत्यक्षात रोबोटचं सिनेमामध्ये अभिनय करणार आहेत. हॉलिवूडमध्ये निर्माते सॅम खोझे आणि अनौश सादेघ अशा एका सिनेमाची निर्मिती करत असून या सिनेमाचं नाव ‘बी’ असं आहे. या सिनेमात ‘एरिका’ नावाची रोबोट मुख्य भूमिका साकारणार आहे.

  हॉलिवूडनंतर आता एका तुर्की सिनेमातही ‘आयपेरा’ ही रोबोट अभिनय करण्यासाठी सज्ज झालीय. ‘डिजिटल ह्यूमन’ असं या सिनेमातं नाव असून आयपेरा या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. आयपेराने या सिनेमाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. निर्माते आणि पटकथा लेखक बिरोल गुव्हेन या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. रोबोट आणि माणसांना एकत्र आणणाऱ्या या सिनेमाचं चित्रीकरण सष्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे.