पती राज कुंद्राच्या अटकेनतंर शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ, कारण…

या प्रकरणानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढ झालीय.

    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आलीय. अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने राज कुंद्राला अटक केलीय. या प्रकरणानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढ झालीय.

    १४ वर्षांनंतर ‘हंगामा-२’ या सिनेमातून शिल्पा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज होती. त्याचसोबत ती बहुप्रतिक्षित सिनेमा ‘निक्कमा’ मधूनही महत्वाच्या भूमिकेत झळकणार होती. अशात शिल्पाचा पती राज कुंद्राच्या अटकेमुळे शिल्पाच्या दोन्ही सिनेमांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. २००३ सालात आलेल्या ‘हंगामा’ या सिनेमाचा ‘हंगामा-२’ या सीक्वल अवघ्या ३ दिवसात म्हणजेच २३ जुलैला रिलीज होणार होता. अशात राज कुंद्राच्या अटकेमुळे आता सिनेमा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढू शकतात.

    शब्बीर खान यांच्या ‘निक्कमा’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्यार जाहीर करण्यात आलेली नाही. २००७ सालामध्ये शिल्पा ‘अपने’ या सिनेमातून मुख्य भूमिकेत झळकली होती. त्यानंतर २००९ सालात तिने राज कुंद्रासोबत लग्न गाठ बांधल्यानंतर सिनेमापासून ब्रेक घेतला. दरम्यान मधल्या काळाच शिल्पा छोट्या पडद्यावर विविध शोमध्ये जजच्या भूमिकेत झळकली.