आणखी एका चित्रपटाशी दोस्ताना तुटला, कार्तिक आर्यनला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता!

आता तो 'धमाका' नावाच्या सिनेमात दिसणार आहे. सिनेमात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. कार्तिकच्या या सिनेमा विषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून बी टाऊनमध्ये बॉलीवुडचा अभिनेता कार्तिक आर्यन .कार्तिकला धर्मा प्रॉडक्शनच्या ‘दोस्ताना 2’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यासाठी करण जोहरला सोशल मीडियावरही ट्रोल केले गेले. याच कारणामुळे तो चर्चेत असताना त्याला आणखी एक धक्का मिळाला आहे. दोस्ताना २ नंतर फॅंटम सिनेमातूनही त्याला काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

    सिनेमाची घोषणा झाल्यानंतर कार्तिकदेखील भूमिकेच्या तयारीत लागला होता. परंतू सिनेमातून त्याने माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे. दिग्दर्शक वसन बाला या फँटम सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. कार्तिकचा हा पहिला सुपरहिरो असलेला सिनेमा होता. त्यामुळे सिनेमात त्याच्या आवडीनुसार त्याने काही गोष्टी सुचवल्या होत्या. कार्तिकची मतं दिग्दर्शक वसन बाला यांना मान्य नव्हती. क्रिएटीव्ह इशूमुळे दिग्दर्शक आणि कार्तिकमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे या सिनेमातून त्याने माघार घेतल्याच म्हटलं जात आहे.

    आता तो ‘धमाका’ नावाच्या सिनेमात दिसणार आहे. सिनेमात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. कार्तिकच्या या सिनेमा विषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

    कार्तिक आर्यनला गेल्या वर्षी लॉकडाउनच्या आधी २ ते ३ कोटी रुपये मानधन घेईन या बोलीवर चित्रपटासाठी साइन केले होते. नंतर त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढली आणि त्याने अधिक मानधन मागितले. कार्तिक आर्यनची ब्रँड व्हॅल्यू १०  कोटींवर गेली आणि त्यांनी निर्मात्यांकडे ही मागणी केली होती.करिअरचा आलेख वाढता पाहून कार्तिकनेही या चित्रपटासाठी मोठी रक्कम मागितली.