सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून केवळ अभिनेत्री गौहर खान आणि झैद दरबार यांच्या निकहाचीच चर्चा रंगली आहे. या दोघांच्या लग्नपत्रिकेपासून ते अगदी रिसेप्शन पर्यंत सोहळ्याचे फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. २५ डिसेंबर रोजी या दोघांचा निकाह झाला. निकाहच्या फोटोमुळे गौहर चर्चेत होती. निकाहनंतर गौहर हनिमुनला न जाता थेट कामाला लागलीये. पण आता ती चर्चेत आलीये वेगळ्याच कारणामुळे. कारण निकाहच्या दोन दिवसानंतर लगेचच गौहर तिच्या एक्स बॉयफ्रेंड कुशाल टंडनला भेटली.

गौहर निकाहच्या दोन दिवसानंतर लखनऊला चित्रीकरणासाठी गेली. त्यावेळी विमानातील प्रवासादरम्यान गौहरची तिचा एक्स बॉयफ्रेंड कुशाल टंडनशी अचानक भेट झाली. कुशलने या भेटीला व्हिडीओ इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला. “मी माझ्या घरी जात होतो आणि अचानक माझ्या एका जुन्या मैत्रिणीची भेट झाली. तिचं नुकतंच लग्न झालं आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे. ही मैत्रीण आहे गौहर खान. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. हाय किस्मत”, असं तो या व्हिडीओत बोलताना दिसतो.
View this post on Instagram
गौहर आणि कुशालने बिग बॉसच्या सातव्या पर्वात भाग घेतला होता. यावेळी दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. बिग बॉसनंतरही हे दोघं अनेकदा एकत्र दिसायचे. पण त्यांचं हे अफेअर फार काळ टिकलं नाही. आता गौहर आणि कुशलच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram