कॉमेडियन कपिल शर्माचा उद्धटपणा कॅमेरात कैद, VIDEO व्हायरल होताच चाहते भडकले!

पिल शर्मा एका व्हील चेअरवर बसलेला असून त्याला ढलकत ढकलत पार्किंगच्या दिशेने नेण्यात येत आहे. पण कॅमेरामनने केलेला कपिलचा पाठलाग त्याला अजिबात आवडला नाही. म्हणून, कपिलने कॅमेरामनला चांगलच सुनावलं.

    कॉमेडी किंग कपिल शर्माचा सध्या मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कपिल शर्माला व्हिल चेअरवरून पार्किंगस्थळी नेण्यात येत आहे. हा व्हिडिओ बघून कपिलला काय झाले असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. व्हिडिओत झालेलं संभाषण ऐकून चाहत्यांचा रागही अनावर झाला आहे. बॉलिवूड पॅपने हा व्हिडिओ शूट केला असून आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्टही केला आहे. या व्हिडिओत कपिल फोटोग्राफर्संना उद्धटपणे बोलताना चित्रित झालं आहे.

    या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा एका व्हील चेअरवर बसलेला असून त्याला ढलकत ढकलत पार्किंगच्या दिशेने नेण्यात येत आहे. पण कॅमेरामनने केलेला कपिलचा पाठलाग त्याला अजिबात आवडला नाही. म्हणून, कपिलने कॅमेरामनला चांगलच सुनावलं. उल्लू के पठ्ठो असे म्हणत कपिलने कॅमेरामनशी उद्धटपणा केला. विशेष म्हणजे हे कॅमेऱ्यात शूट झालंय, असे म्हटल्यावरही कपिलने पुन्हा आपला तोरा कायम ठेवला. ओये हटो पिछे सारे तुम लोग, तुम लोग बत्तमिजीयाँ करते हो.. असे कपिल म्हणाला.

    कॅमेरामनने शूट केलेला व्हिडिओ डिलीट करण्याबाबत कपिलच्या सहकाऱ्यानेही कॅमेरामनला सांगितले. मात्र, कॅमेरामनने नकार दिला असून सध्या कपिलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कपिलच्या उद्धटपणावरुनही अनेकांनी कपिलला सुनावलं आहे.