अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनंतर विणा जगतापने सोडली मालिका, आता ‘ही’ अभिनेत्री दिसणार आर्याच्या भूमिकेत!

'आई माझी काळुबाई' या मालिकेत सध्या विराटच्या आसुरी प्रभावाखाली असलेले पाटील विरुद्ध श्रद्धा-भक्तीचे पाठबळ असलेले  पुरोहित  कुटुंब यांच्यातला संघर्ष शिगेला पोचला  आहे.

  मराठी मालिकाविश्वातील लोभस चेहर्याची गोड अभिनेत्री म्हणून रश्मी अनपट हे नाव डोळ्यासमोर येतं. रश्मी आता सोनी मराठी वाहिनीवरच्या अफाट लोकप्रियता लाभलेल्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत ‘आर्या’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे. या आधी आर्याच्या भूमिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड दिसली होती. प्राजक्ताने मालिका सोडल्यानंतर अभिनेत्री विणा जगताप आर्याच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसली. तर आता लवकरच रश्मी अनपट आर्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

  या मालिकेत सध्या विराटच्या आसुरी प्रभावाखाली असलेले पाटील विरुद्ध श्रद्धा-भक्तीचे पाठबळ असलेले  पुरोहित  कुटुंब यांच्यातला संघर्ष शिगेला पोचला  आहे. या महतत्त्वाच्या  टप्प्यावर  रश्मीने साकारलेली आर्या प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी असेल.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

  लोकप्रिय युवा अभिनेता  विवेक सांगळे याच्याबरोबर अलका कुबल-आठल्ये, शरद पोंक्षे, मिलिंद शिंदे, प्रसन्ना केतकर, संग्राम साळवी, अनिकेत केळकर, मंजूषा गोडसे, स्मिता ओक, प्राजक्ता दिघे, जान्हवी किल्लेकर, लीना दातार, पार्थ केतकर, शुभंकर एकबोटे  या दमदार अभिनयसंपन्न कलाकारांबरोबर रश्मीचे ‘आर्या’ साकारणे हे या मालिकेचे वेगळेपण ठरेल.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

   

  मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता, २९ मार्च ते ३ एप्रिल हा सप्ताह एका तासाच्या विशेष भागांचा असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, ‘आई माझी काळुबाई’. सोम.-शनि., संध्या. ६.३०  वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.