राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ, घेतला मोठा निर्णय!

मंगळवारी ‘सुपर डान्सर-४’ चं मुंबईत शूटिंग पार पडणार होतं. मात्र राज कुंद्राला अटक झाल्याने शिल्पा शेट्टी शूटिंगलला पोहचली नाही.

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्यात वाढ झाली आहे.  

    शिल्पा शेट्टीने ‘सुपर डान्सर-४’ शूटिंग करणं रद्द केलंय. मंगळवारी ‘सुपर डान्सर-४’ चं मुंबईत शूटिंग पार पडणार होतं. मात्र राज कुंद्राला अटक झाल्याने शिल्पा शेट्टी शूटिंगलला पोहचली नाही. मंगळवारी २० जुलैला मुंबईत या शोच्या एपिसोडचं शूटिंग पार पडणार होतं. शिवाय या भागासाठी अभिनेत्री करिश्मा कपूर गेस्ट म्हणून हजेरी लावणार होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणी शिल्पा शेट्टीने तिचं शूटिंग रद्द केलं. त्यामुळे उर्वरित परिक्षकांच्या उपस्थितीत शूटिंग पार पडलं.

    सूत्रांच्या माहितीनुसार करिश्मा कपूरलाच पुढील दोन दिवसांसाठी लॉक करण्यात आलं आहे. एवढचं नाही तर शिल्पा जर शोमध्ये पुन्हा आली नाही तर करिश्मा कपूर शिल्पाच्या जागी रिल्पेस होऊ शकते. सध्या शोची मेकिंग टीम शिल्पाच्या परतण्याची वाट पाहत असून शिल्पाला शूटिंगवर परतणं शक्य झालं नाही तर टीम करिश्मा कपूरशी संपर्क साधणार आहे.