rhea chakraborty

रियाची एक लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. मात्र  रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. रियाला पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा(anubhav sinha tweet) यांनी रिया जेलमधून बाहेर येताच ट्विट केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. त्यानंतर एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. या प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली. रियासोबत तिचा भाऊ शौविकलाही अटक करण्यात आली. दरम्यान रिया चक्रवर्तीला आज मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर(bail granted to rhea from mumbai high court) करण्यात आला आहे. रियाची एक लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. मात्र  रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. रियाला पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा(anubhav sinha tweet) यांनी रिया जेलमधून बाहेर येताच ट्विट केले आहे.

अनुभव सिन्हा यांनी आधी रियाच्या सुटकेची मागणी केली होती.  आता रियाला जामीन मिळाल्यानंतर  अनुभव यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अखेर तिचा जामीन मंजूर झाला आहे.’ अनुभव यांच्या ट्विटवर हंसल मेहता(hansal mehta tweet) यांनी ‘जा आणि आता थोडा आराम कर’ असे ट्विट केले आहे.रियाला जामीन मिळाला असला तरी तिचा भाऊ शौविक याचा जामीन फेटाळण्यात आला आहे.