सारानंतर सैफ अली खानच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, अभिनेता म्हणून नाही तर…

इब्राहीमची बहिण सारा अली खान ऑलरेडी बॅालिवूडमध्ये स्थिरस्थावर झाली आहे. तिच्या मागोमाग आता इब्राहिमही नेम अँड फेम कमावण्यासाठी सज्ज झाला आहे.

    आणखी एक स्टारपुत्र बॅालिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी सध्या मेहनत करत आहे. सैफ अली खानचा मुलगा इब्राहीम अली खान बॉलिवूडमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे, पण अभिनेता म्हणून नव्हे, तर असिस्टंट दिग्दर्शक म्हणून… बऱ्याच दिवसांपासून निर्मात्याच्या भूमिकेत असलेला करण जोहर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडं वळल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे.

    धर्मा प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तो ‘रॅाकी और रानी की प्रेम कहानी’ नावाचा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटासाठी इब्राहीम असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. इब्राहीमची बहिण सारा अली खान ऑलरेडी बॅालिवूडमध्ये स्थिरस्थावर झाली आहे. तिच्या मागोमाग आता इब्राहिमही नेम अँड फेम कमावण्यासाठी सज्ज झाला आहे.

    इब्राहीम सोशल मीडियावर खूप पॉप्युलर असून, त्याच्या पर्सनॅलिटीवर बऱ्याच तरुणी फिदाही आहेत. याखेरीज दिग्दर्शिका झोया अख्तर त्याला नायकाच्या रूपात लाँच करणार असल्याचं समजतं. यात त्याच्या जोडीला सुहाना खान आणि खुशी कपूर स्क्रीन शेअर करणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.