‘द फॅमिली मॅन २’च्या ट्रेलरमध्ये आसिफ बसरा यांना पाहून चाहते झाले भावूक, सहा महिन्यांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली होती!

नैराश्यामध्ये त्यांनी इतके टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात होते. आता त्यांच्या निधनानंतर ‘द फॅमिली मॅन २’ या सीरिजमध्ये त्यांना पाहून चाहते भावूक झाले आहेत.

   ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या सीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी, समंथा अक्किनेनी आणि प्रियमणि हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पण ट्रेलर प्रदर्शित होताच या कलाकरांसोबतच अभिनेते आसिफ बसरा हे चर्चेत आहे. द फॅमिली मॅन’ या सीरिजमध्ये आसिफ मानसोपचार तज्ज्ञांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

  सहा महिन्यांपूर्वी अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली. आसिफ बसरा यांचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. नैराश्यामध्ये त्यांनी इतके टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात होते. आता त्यांच्या निधनानंतर ‘द फॅमिली मॅन २’ या सीरिजमध्ये त्यांना पाहून चाहते भावूक झाले आहेत.

   

  काय आहे ट्रेलरमध्ये

  २ मिनिटं ४९ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये फॅमिली मॅन ऊर्फ श्रीकांत तिवारीची कथा दाखवण्यात आली आहे. या सीझनमध्‍ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्‍पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सीरिजच्‍या ९ भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्‍तचर अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.

  ‘द फॅमेली मॅन २’ ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होती. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता ही सीरिज ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.