सुबोध भावेनंतर आणखीन ६ मराठी कलाकारांना झाली कोरोनाची लागण

सुबोध भावे यांच्यानंतर आणखी ६ मराठी कलाकारांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे (subodh bhave) च्या घरात कोरोनाने(corona) शिरकाव केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आणखीन काही मराठी कलाकारांना (marathi actors) कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बिग बॉस मराठीच्या सीझन २ (bigg boss marathi season 2) मधील स्पर्धक अभिजीत केळकर (abhijeet kelkar) आणि तुला पाहते रे मालिकेतील अभिनेत्री पुर्णिमा डे (purnima day) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

नुकतेच झी युवा वाहिनीवरील सिंगिंग स्टार या सेलिब्रिटी रिअ‍ॅलिटी शोमध्ये अभिजीत व पुर्णिमा स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. या शोच्या सेटवरच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती मात्र आता ते दोघेही बरे झाले आहेत.

सेटवरील दोन क्रू मेंबर्सही कोरोनाबाधित आहेत असे समजते आहे. त्यामुळे १० सप्टेंबरपर्यंत या शोचे शूटिंग बंद ठेवण्यात आले आहे.

View this post on Instagram

…नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोना ची लागण झाली… माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी,खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती… डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली… त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे… माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत… तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत धन्यवाद…

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkarofficial) on

अभिजीत केळकरने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे इंस्टाग्रामवर सांगितले. त्याने लिहिले की, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली. माझी फक्त पाठ दुखत होती या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हते किंवा सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षण नव्हती. डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली व त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रिटमेंट घेत आहे. आता माझी तब्येत उत्तम आहे. तसेच अभिजीतने पत्नी तृप्ती आणि मुले राधा व मल्हार यांचीही प्रकृती उत्तम असल्याचेही सांगितले आहे.