आता ‘अग्गंबाई सासूबाई’ तर ‘अग्गंबाई सूनबाई’ म्हणा, कारण तुम्हीच वाचा…

आता या नव्या मालिकेची कथा काय असेल, सध्या सुरु असलेल्या मालिकेशी त्याचा काही संबंध असेल की फक्त नावातच साम्य आहे, यात अजून कोणकोणते कलाकार पाहायला मिळतील याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता नक्कीच आहे.

    ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका लवकरच निरोप घेणार असं दिसतय. कारण आता ‘अग्गंबाई सूनबाई’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. १२ मार्चपासून ही नवी मालिका सुरु होत आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

    याच्या प्रोमोमध्ये दिसतंय की आसावरी म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ एका मिटिंगमध्ये बसलीये आणि अभिजीत राजे अर्थात अभिनेते डॉ. गिरीश ओक त्यांना फोन करून जेवणाबद्दल विचारतायत. याच प्रोमोत शुभ्राही दिसतेय. पण ही शुभ्रा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान नाहीये. तर अभिनेत्री उमा ऋषीकेश दिसमार आहे. या आधी उमा स्वामिनी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. आता उमा ‘अग्गंबाई सूनबाई’ या मलिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसणार आहे.

    आता या नव्या मालिकेची कथा काय असेल, सध्या सुरु असलेल्या मालिकेशी त्याचा काही संबंध असेल की फक्त नावातच साम्य आहे, यात अजून कोणकोणते कलाकार पाहायला मिळतील याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता नक्कीच आहे.