अखेर मालिकेतील ‘त्या’ दृश्याबद्दल ‘अद्वैत दादरकर’ने मागितली माफी!

“अगबाई सुनबाई” मालिकेत मुख्य कलाकार अभिनेता ‘अद्वैत दादरकर’ याने सुद्धा शिंपी समाज बांधवांची माफी मागितली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील अद्वैतने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

  झी मराठीवरील लोकप्रिय “अगबाई सुनबाई” ही मालिका  गेल्या काही दिवसांपासून चांगलीच अडचणीत सापडली आहे.  मालिकेतील एका दृश्याबदद्ल शिंपी समाजातील बांधवानी अक्षेप घेतला. आणि संपूर्ण महाराष्ट्र भर या मालिकेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

  “अगबाई सुनबाई” या मालिकेत कलाकाराने शिलाई मशीनला लाथ मारल्याचे दृश्य दाखवण्यात आले होते आणि या कारणावरून शिंपी समाज बांधवांकडून मालिकेविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आता या मालिकेतील तो  सिन काढण्यात आला  आहे. त्या दिवसाचा पूर्ण भाग देखील हटवण्यात आला आहे. त्यानंतर “अगबाई सुनबाई” मालिकेत मुख्य कलाकार अभिनेता ‘अद्वैत दादरकर’ याने सुद्धा शिंपी समाज बांधवांची माफी मागितली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील अद्वैतने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

   

  काय आहे व्हिडिओमध्ये

  “हा प्रसंग दाखवण्यामागे शिंपी समाजाच्या भावना दुखवण्याचा हेतु नव्हता. आम्हा सर्वांना याबद्दल भयंकर वाईट वाटतंय. आम्हाला चित्रिकरण करताना तसं सांगितलं होतं. हेतु जरी तो नसला तरीदेखील मनापासून माफी मागतो. यापुढे असं कुठलंही कृत्य आमच्याकडून घडणार नाही याची काळजी घेऊ, तसेच मालिकेतील तो प्रोमो काढण्यात आला असून त्या दिवसाचा पूर्ण भाग देखील हटवण्यात आला आहे.’ असे अद्वैत दादरकरने या व्हिडीओमध्ये म्हंटल आहे.