‘तड़प – अँन इनक्रेडिबल लव स्टोरी’, तारा सुतारियाबरोबर हा अभिनेता दिसमार मुख्य भूमिकेत!

तड़प' मिलन लूथरिया दिग्दर्शित चित्रपट असून अहान शेट्टी, तारा सुतारिया, सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा आणि सुमित गुलाटी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

    नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंटचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘तड़प – अँन इनक्रेडिबल लव स्टोरी’, ज्यामध्ये तारा सुतारियासोबत अहान शेट्टी बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहे, 3 डिसेंबर, 2021ला सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित होणार आहे. साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत अहान शेट्टीचे हे बॉलीवूड पदार्पण एका वारशाला पुढे घेऊन जाणारे आहे, कारण सुनील शेट्टीला देखील याच निर्मात्यांद्वारा लॉन्च करण्यात आले होते आणि पुन्हा एकदा या योगदानाबद्दल ते उत्साहित आहेत.

    अहानसोबत तारा सुतारिया आहे, जिने दोन वर्षांपूर्वी या शोबिजमध्ये प्रवेश केला असून छोट्याशा अवधीत  आपल्या समकालीनांमध्ये आपली जागा बनवली आहे. अहान शेट्टी आणि तारा सुतारिया एका नव्या फ्रेश  जोडीसोबत सर्वात रोमांचक पद्धतीने समोर येणारी प्रेम कहाणी, प्रेक्षकांसाठी निश्चितपणे एक छानशी ट्रीट असेल. ‘तड़प’मधील अहानच्या फर्स्ट लुकने प्रेक्षकांमध्ये उत्साहाची एक मोठी लाट निर्माण केली आहे आणि एक नवा चेहरा पाहण्यासाठी सगळे उत्साहित आहेत.

    चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करताना, नाडियाडवाला ग्रैंडसनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले, “POST TO BE ADDED.” ‘तड़प’ मिलन लूथरिया दिग्दर्शित चित्रपट असून अहान शेट्टी, तारा सुतारिया, सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा आणि सुमित गुलाटी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केलीये. चित्रपटाची कथा रजत अरोरा यांनी लिहिली असून प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे.