केवळ शाहरूख खान होता म्हणून ऐश्वर्या रायने दिला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाला नकार, नाहीतर दिसणार होती ‘या’ भूमिकेत!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटातील टिनाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक करण जोहरनं ऐश्वर्या राय विचारलं होतं. परंतु तिनं शाहरुखच्या पत्नीची भूमिका साकारण्यास नकार दिला होता.

    ‘कुछ कुछ होता है’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक. १९९८ साली आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही हा चित्रपट फार लोकप्रिय आहे. राणी मुखर्जी, शाहरूख खान आणि काजोलच्या भन्नाट केमिस्ट्रीमुळे हा चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटातील टिनाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक करण जोहरनं ऐश्वर्या राय विचारलं होतं. परंतु तिनं शाहरुखच्या पत्नीची भूमिका साकारण्यास नकार दिला होता.

    अनेक अभिनेत्रींनी दिला नकार

    कुछ कुछ होता है या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरनं केलं होतं. या चित्रपटासाठी त्यानं ट्विंकल खन्ना, करिश्मा कपूर, रवीना टंडन आणि ऐश्वर्या राय यांना विचारलं होतं. परंतु यापैकी कुठल्याच अभिनेत्रीनं चित्रपटात काम करण्यास होकार दिला नाही. काही अभिनेत्री इतर चित्रपटांमध्ये व्यस्त होत्या. तर काहींना पटकथा आवडली नाही. फक्त ऐश्वर्याला पटकथा प्रचंड आवडलं होती. परंतु शाहरुख खानच्या पत्नीची भूमिका मात्र साकारण्यास ती तयार नव्हती. अखेर या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला विचारण्यात आलं. या सुपरहिट चित्रपटानंतर राणी मुखर्जी रातोरात लोकप्रिय अभिनेत्री झाली.

    म्हणून दिला नकार

    ऐश्वर्यानं अलिकडेच एका मुलाखतीत या नकारामागील कारण सांगितलं. ती म्हणाली, “त्यावेळी मी नवी अभिनेत्री होते. मला चित्रपटांमध्ये अभिनय करायचा होता. केवळ हिरोमागे उभं राहून सुंदर दिसायचं नव्हतं. जर त्या व्यक्तीरेखेत खरंच दम असता तर मी होकार दिला असता.