Ajay Atul

‘इंडियन आयडॉल - मराठी’चं परीक्षण संगीतसृष्टीतील दिग्गज संगीतकार जोडी अजय आणि अतुल(Ajay Atul To Judge Indian Idol Marathi) करणार आहेत.

    सोनी मराठी वाहिनीवर प्रथमच ‘इंडियन आयडॉल – मराठी’(Indian Idol Marathi) सुरू होणार आहे. ‘इंडियन आयडॉल – मराठी’चं परीक्षण संगीतसृष्टीतील दिग्गज संगीतकार जोडी अजय आणि अतुल(Ajay Atul To Judge Indian Idol Marathi) करणार आहेत. पुण्यातील(Pune) नारायण पेठ येथे भित्तिचित्राद्वारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह डिरेक्टर अमित फाळके आणि फ्रीमेन्टल निर्मिती संस्थेचे केशव कौल उपस्थित होते.

    अजय-अतुल यांनी आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली आणि पुण्यात भित्तचित्राद्वारे त्या दोघांचं नाव ‘इंडियन आयडॉल – मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आलं.

    मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच अशा प्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे शहरात या भित्तिचित्राची सगळीकडे चर्चा आहे. शहराच्या मधोमध असलेलं हे चित्रं पुणे शहरवासीयांचं लक्ष वेधून घेतं आहे. निखिल खैरनार या कलाकारानं हे भित्तिचित्र काढलं आहे. फ्रीमेन्टल या निर्मिती संस्थेनं ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. ‘इंडियन आयडल – मराठी’ची ऑनलाईन ऑडिशन्स सोनी लिव्हवर सुरू आहेत.