अजय देवगणने खरेदी केलं बिग बींच्या बंगल्यापेक्षा मोठं घरं, किंमत ऐकून धक्का बसेल!

अजय देवगणने मुंबईतील जूहू परिसरात तब्बल ६० कोटींचा एक भव्य बंगला खरेदी केलाय. अजय सध्या रहात असलेल्या घराशेजारीच हा बंगला घेण्यात आला आहे.

  बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सध्या मात्र मोठ्या प्रॉपर्टींमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही दिवसात मुंबई आणि आसपासच्या भागात घर खरेदी केल्याचं पाहायला मिळतंय. जान्हवी कपूर, अर्जून कपूर, आलिया भट्ट आणि बिग बीनंतर आता अजय देवगणने देखील नवं घर खरेदी केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

  अजय देवगणने मुंबईतील जूहू परिसरात तब्बल ६० कोटींचा एक भव्य बंगला खरेदी केलाय. अजय सध्या रहात असलेल्या घराशेजारीच हा बंगला घेण्यात आला आहे. हा बंगला ५ हजार ३१० चौरस फूट परिसरात पसरलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून काजोल आणि अजय देवगण मुंबईमध्ये नव्या घराचा शोध घेत होते. अखेर त्यांना त्यांच्या राहत्या घरापासून जवळ असलेल्या भागातच हे नवं घरं सापडलं. या महिन्याच्या सुरुवातीला अजय देवगण आणि त्याची आई वीणा विरेंद्र देवगण यांच्या नावावर हा बंगला ट्रान्सफर करण्यात आला आहे. अजय देवगणने बंगल्याचा ताबा घेतला आहे. सध्या बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय.

  बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील २०२० सालामध्ये मुंबईत नवं घरं खरेदी केलं होतं. या घराची किंमत ३१ कोटी रुपये इतकी आहे. नुकतच या घराचं रिजिस्ट्रेशन करण्यातं आलं असून या घरासाठी अमिताभ यांनी ६२ लाख रुपये स्टॅम ड्युटी भरली असल्याचे समोर आलंय.