ajay devgn

प्रत्येकाची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि सरकारनं दिलेल्या प्रोटोकॉलचं पूर्ण पालन करून चित्रपट पूर्ण करण्याकडे सध्या आपला कल असल्याचं सांगण्यात आलं आहे.

  बायोग्राफीकल स्पोर्टस फिल्म असलेल्या ‘मैदान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘मैदान’ चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार की ओटीटीवर याबाबत सर्वत्र संभ्रम आहे. वेगवेगळ्या बातम्या या संभ्रमात भर घालण्याचं काम करत असल्यानं अखेर ‘मैदान’च्या निर्मात्यांच्या वतीनं एक स्टेटमेंट रीलीज करण्यात आलं आहे.

  ‘मैदान’चे निर्माते बोनी कपूर, अक्ष चावला आणि अरुणवा जॅाय सेनगुप्ता यांनी रीलीज केलेल्या स्टेटमेंटमध्ये ‘मैदान’च्या प्रदर्शनाबाबत खुलासा केला आहे. ‘मैदान’ ओटीटीवर रिलीज करण्याबाबत किंवा पर पे व्ह्यू अंतर्गत प्रदर्शित करण्याबाबत काहीही बोलणी सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे. प्रत्येकाची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि सरकारनं दिलेल्या प्रोटोकॉलचं पूर्ण पालन करून चित्रपट पूर्ण करण्याकडे सध्या आपला कल असल्याचं सांगण्यात आलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

  १९५२ ते ६२ या काळातील भारतीय फुलबॅाल संघावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटात अजयनं सय्यद अब्दुल रहीम या फुलबॅाल कोचची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट १५ आॅक्टोबर २०२१ रोजी प्रदर्शित करण्याची योजना आहे.