ajay devgn

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने आपल्या नव्या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा केलीये. हा सिनेमा १५ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणने चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत याविषयी त्याच्या चाहत्यांना माहिती दिली. या चित्रपटाचं नाव आहे मैदान.

अजयने आपल्या ट्विटमध्ये लिहीलं आहे, आता मैदान २०२१ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर जगभरातील थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. २०२१ च्या जानेवारीत शुटींगला सुरूवात होईल. यावेळी अजय शेअर केलेल्या पोस्टरमध्ये त्याचा रेट्रोलूक दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

या सिनेमात अजय फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहील यांच्या भमिकेत दिसेल. रहीम यांच्या नेतृत्त्वाखाली १९५६ च्या स्पर्धेत ऑलंपिकच्या उपांत्य फेरीपर्यंत बाजी मारली होती. फुटबॉलचा सुवर्ण काळ म्हटला जाणार १९५२ ते १९६५ हा १० वर्षांचा प्रवास चित्रपटात रेखाटला जाणार आहे. अजय देवगण यांच्यासोबत प्रियामणी, गजराज राव, आणि बंगाली अभिनेत्री रूद्रनील घोष आहेत. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर, आकाश चावला आणि अरूणवा जॉय यांनी केली आहेत. लखनऊ, कोलकत्ता आणि मुंबईत चित्रपटाचं शुटींग होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)