तिसऱ्यांदा उभारणार ‘मैदान’ चित्रपटाचा सेट, कोट्यावधी रूपये गेले आहेत पाण्यात!

अजय देवगण काम करत असलेल्या या सिनेमाची निर्मिती बोनी कपूर करत आहेत. त्यांनी सांगितले की, तौक्ते चक्रीवादाळामध्ये या सिनेमाचा संपूर्ण सेट उद्ध्वस्त झाला आहे.

    कोरोनामुळे चित्रपटसृष्टीचे अतोनात नुकसान झाले असतानच तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला. या वादळामुळे अनेक सिनेमांच्या सेटचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये अजय देवगणच्या ‘मैदान’ सिनेमाचाही समावेश आहे. या चक्रीवादळामुळे या सिनेमाचा सेट संपूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. याआधीही हा सेट कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे तोडण्यात आला होता. हा सिनेमा खेळावर आधारीत असून त्यामध्ये अजय देवगण याने सय्यद अब्दुल रहिम नावाच्या फूटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे.

    अजय देवगण काम करत असलेल्या या सिनेमाची निर्मिती बोनी कपूर करत आहेत. त्यांनी सांगितले की, तौक्ते चक्रीवादाळामध्ये या सिनेमाचा संपूर्ण सेट उद्ध्वस्त झाला आहे. या सिनेमाचा सेट मी आता तिस-यांचा उभारत आहे. आताचा लॉकडाऊन नसता तर या सिनेमाचे चित्रीकरण कधीच पूर्ण झाले असते. परंतु करोनामुळे सर्व गणिते बिघडली आहेत. केवळ सेटवरील पीच शाबूत राहिले आहे. अर्थात पीचचेही किरकोळ नुकसान झाले आहे. परंतु ते दुरूस्त करता येणार आहे.

    हा सिनेमा केवळ थिएटरमध्ये जाऊनच बघण्यासारखा आहे. त्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्येच प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाचे जेवढे चित्रीकरण झाले आहे, त्याचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू केले आहे.