‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद,  एका चाहतीने साकारली रांगोळी!

या  रांगोळीला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळते आहे. मुक्ता आणि उमेश यांनीही रश्मीने काढलेली रांगोळी शेअर करून तिचे आभार व्यक्त केले आहेत. 

    ‘अजूनही बरसात आहे’ मालिका १२ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  मीरा आणि आदिराज यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. प्रेक्षकांच्या या आवडत्या जोडीसाठी तुफान प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेचा पहिला लुक प्रेक्षकांसमोर आला  आणि प्रेक्षकांच्या मनात मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली होती. 

    मालिकेच्या आजपर्यंतच्या सगळ्या प्रोमोंना, पोस्टर्सना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, याशिवाय रश्मी विसपुते नावाच्या एका चाहतीने स्वतःच्या घरात ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेची चक्क रांगोळी काढली आहे. रश्मी ही नाशिकची असून मुक्ता आणि उमेश या दोघांची मोठी चाहती आहे. 

    या  रांगोळीला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळते आहे. मुक्ता आणि उमेश यांनीही रश्मीने काढलेली रांगोळी शेअर करून तिचे आभार व्यक्त केले आहेत. आता मालिकेत पुढे काय घडेल याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.