देशवासियांच्या मदतीला अक्षय आणि ट्विंकल आले धावून, लंडनहून आणतायत तब्बल २२० ऑक्सिजन कंसंट्रेटर!

ट्विंकल खन्नाने मंगळवारी ट्विट करत अधिकृत आणि विश्वासार्ह एनजीओची माहिती मागितली होती. जे एनजीओ रुग्णांच्या मदतीसाठी ऑक्सिजन सिलेंडर पुरवतात.

  अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने देशातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता सुमारे १००  ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर ट्विंकल खन्नाने अधिकची माहिती दिली आहे की, त्यांच्यासोबत लंडनमधील भारतीय स्थित डॉक्टरांनी १२० ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मदतीसाठी तब्बल २२० ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्यात येतील, असं ट्विंकलने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  ट्विंकलच्या या संवेदनशील स्वभावाचं सोशल मीडियातून कौतुक होत आहे. भारतात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांना योग्य वेळेत ऑक्सिजन बेड, इंजेक्शन आणि उपचार मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या विदारक परिस्थितीत आता कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करतायते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

   

  ट्विंकल खन्नाने मंगळवारी ट्विट करत अधिकृत आणि विश्वासार्ह एनजीओची माहिती मागितली होती. जे एनजीओ रुग्णांच्या मदतीसाठी ऑक्सिजन सिलेंडर पुरवतात. मी त्यांना थेट लंडनवरुन ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करेन. ट्विंकलचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरलदेखील झाले होते. सगळीकडे तिच्या या निर्णयचे कौतुक करण्यात आले होते.