akshay kumar

फोर्ब्सच्या यादीनुसार (list of Forbes) जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ( highest earning actor) पहिल्या दहा जणांच्या यादीत स्थान मिळवणार ‘अक्षय कुमार’ (Akshay kumar) हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे. अक्षय यादीत सहव्या क्रमांकावर आहे. ही यादी १ जून २०१९ ते १ जून २०२० च्या कमाईनुसार तयार करण्यात आली आहे.

फोर्ब्सच्या यादीनुसार (list of Forbes) जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ( highest earning actor) पहिल्या दहा जणांच्या यादीत स्थान मिळवणार ‘अक्षय कुमार’ (Akshay kumar) हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे. अक्षय यादीत सहव्या क्रमांकावर आहे. ही यादी १ जून २०१९ ते १ जून २०२० च्या कमाईनुसार तयार करण्यात आली आहे. या यादीत ड्वेन जॉनसन ज्याला सगळे ‘द रॉक’ नावाने ओळखतात तो पहिल्या स्थानावर आहे. द रॉकची कमाई ८७.५ मिलियन डॉलरची इतकी आहे. अक्षयची कमाई ४८.५ मिलियन डॉलर म्हणजेच ३६२ कोटी रूपये इतकी आहे.

अक्षय कुमारची यातील सर्वाधिक कमाई प्रॉडक्ट एंडोर्समेंटमुळे झालेली आहे. अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ९ नोव्हेंबरला या देशांमधील सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. अक्षय सध्या त्याच्या आगामी ‘बेल बॉटम’ आणि ‘पृथ्वीराज’ सिनेमाचं शूटींग करत आहे.

या यादीतील सर्वाधिक कमाई करणारे पहिले सहा अभिनेते
ड्वेन जॉनसन
रयान रेलॉल्ड्स
मार्क व्हालबर्ग
बेन एफ्लेक
विन डिजल
अक्षय कुमार