akshay kumar

अभिनेता अक्षय कुमार लवकरच एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येतोय. या चित्रपटाचं नाव आहे बच्चन पांडे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरमुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. अजून एक चकीत करणारी गोष्ट म्हणजे अक्षय कुमारने या चित्रपटासाठी तब्बल ९९ कोटी मानधन म्हणून घेतलय.

akshay-kumar

सर्वसाधारणपणे अक्षय एका चित्रपटासाठी ११० ते १२५ कोटी रुपयांचं मानधन घेतो. पण चित्रपटाची कथा उत्तम आहे व निर्माता खूप चांगला मित्र असल्यामुळे त्याने केवळ ९९ कोटी रुपयांत होकार दिला आहे.  अक्षय आणि चित्रपटाचे निर्माते साजित नाडियाडवाला यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. आपल्या खास मित्रासाठी त्याने कमी मानधनातही चित्रपट करण्यास होकार दिला आहे.

कोण आहे बच्चन पांडे

बच्चन पांडे हा एक अक्शन थ्रिलर मूव्ही आहे. या चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरु आहे. यामध्ये अक्षयसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिका साकारणार आहे. तर फरहाद सामजी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ऑक्टोंबर २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.