चित्रपटासाठी वाट्टेल ते… अक्षयने वाढवलं वजन, लूक बघून चाहते हैराण!

फिटनेसच्या बाबतीत सजग असणारा आणि फिटनेसचं उत्तम उदाहरण असणाऱ्या अक्षयनं 'रक्षा बंधन'साठी आलं वजन वाढवलं आहे.

    काही कलाकार एखाद्या व्यक्तिरेखेसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला तयार असतात. अक्षय कुमारही त्यापैकीच एक आहे. अक्षनं नेहमीच आपल्या कृतीद्वारे ते सिद्धही केलं आहे. सध्या एका मागोमाग एक आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करण्यात बिझी असलेल्या अक्षयनं ‘रक्षा बंधन’ या आगामी महत्त्वपूर्ण चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे.

    फिटनेसच्या बाबतीत सजग असणारा आणि फिटनेसचं उत्तम उदाहरण असणाऱ्या अक्षयनं ‘रक्षा बंधन’साठी आपलं वजन वाढवलं आहे. आनंद एल. राय यांच्या या चित्रपटात अक्षय दिल्लीवासी तरुणाची व्यक्तिरेखा साकारत आहे. अक्षयनं एकीकडं ‘सूर्यवंशी’त कॅाप साकारण्यासाठी सहा किलो हजन घटवलं होतं, तर ‘रक्षा बंधन’साठी वजन वाढवलं आहे.

    व्यक्तिरेखेची गरज म्हणून अक्षयनं नैसर्गिक पद्धतीनं पाच किलो वजन वाढवल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईमध्ये सध्या ‘रक्षा बंधन’चं शूटिंग वेगात सुरू आहे. या चित्रपटात अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत पाच नवे चेहरे झळकणार आहेत.