akshay kumar

भारतीय सैन्य दिवसाचे(Indian army day) औचित्य साधून अभिनेता अक्षय कुमार(akshay kumar) आणि अभिनेत्री क्रिती सनॉनने (kriti sanon)जैसलमेरमधील(jaisalmer) जवानांची भेट घेतली.

भारतीय सैन्य दिवसाचे(Indian army day) औचित्य साधून अभिनेता अक्षय कुमार(akshay kumar) आणि अभिनेत्री क्रिती सनॉनने (kriti sanon)जैसलमेरमधील(jaisalmer) जवानांची भेट घेतली. अक्षय कुमारने त्यांच्याशी बातचीत केली. या दिवसाचे औचित्य साधून अभिनेत्याने विजय रण फॉर सोल्जर मॅरेथॉनला हिरवा कंदिल दाखवला. जवानांनीदेखील या दोघांचे जंगी स्वागत केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

सैन्य दिवसाच्या निमित्ताने सकाळी जैसलमेरमधील आर्मी स्टेशनच्या सगत सिंग स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजय रण फॉर सोल्जर मॅरेथॉनला अक्षय कुमार आणि क्रिती सनॉनने हिरवा कंदिल दिला. तसेच खिलाडी अक्षय कुमारने जवानांसोबत व्हॉलीबॉल खेळला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी त्या ठिकाणी सैन्यांचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने जवान उपस्थित होते. सैन्यातील जवान या  स्टार्सना पाहण्यासाठी खूप उत्सुक दिसले.