akshay kumar

कोरोनाच्या संकट काळानंतर मागच्या वर्षी कामावर रूजू होणारा अक्षय पहिला अॅक्टर ठरला होता. आता साथीच्या दुसर्‍या लाटेनंतरही अक्षय शूटिंगवर लवकरच परतणार असल्याचं प्रोडक्शन हाऊसच्या वतीनं सांगण्यात येत आहे.

    अक्षय कुमार आपल्या कामाबद्दल नेहमीच पॅाझिटीव्ह आणि प्रामाणिक असतो. घड्याळाच्या काट्यानुसार अक्षयही काम करतच राहतो. एका मागोमाग एक हिट चित्रपट रसिकांचं मनोरंजन करण्याचा वसा जपत असतो. अक्षय या आठवड्याच्या शेवटी मुंबईतील फिल्मसिटी स्टुडिओमध्ये ‘रक्षाबंधन’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    हिमांशु शर्मा आणि कनिका ढिल्लनद्वारा लिखित, आनंद एल. राय द्वारा दिग्दर्शित या चित्रपटासाठी फिल्मसिटीमध्ये भव्य सेट उभारण्यात आला असून, कोरोना संदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळत शूट करण्याची योजना आखण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण युनिट बायो बबलमध्ये असेल. कोरोनाच्या संकट काळानंतर मागच्या वर्षी कामावर रूजू होणारा अक्षय पहिला अॅक्टर ठरला होता. आता साथीच्या दुसर्‍या लाटेनंतरही अक्षय शूटिंगवर लवकरच परतणार असल्याचं प्रोडक्शन हाऊसच्या वतीनं सांगण्यात येत आहे.

    या संकट काळात अक्षयनं कोरोनाग्रस्तांसोबतच गोरगरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. स्वत:सोबतच इतरांनाही मदत करण्याचं आवाहन केल्यानं कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना दिलासा मिळाला होता.