akshay kumar

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार अनेकवेळा चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटामुळे तर कधी राजकीय संबंधांमुळे अक्षय चर्चेत असतो. पण आता एका अक्षय एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलाय. राजधानी दिल्लीत सध्या शेतकरी आंदोलन पेटलय आणि देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय. त्यातच अक्षयने एक जाहिरात शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आणि अक्षय ट्रोल झाला.

अक्षयने त्याच्या सोशल अकाऊंटवर पगार बुकची जाहीरात शेअर केली. या जाहीरातीत अक्षय मासिक वेतन, अडेंटेन्स आणि अडव्हान्स पेमेंट यासारख्या आवश्यक गोष्टींचा डिजिटल व्यवहार कसा करावा हे सांगतोय. अब इंडियाका हर बिझनेसमन होगा डिजीटल असही तो या जाहीरातीत म्हणतोय. अक्षयने ही जाहीरात शेअर केली आणि लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरूवात केलं.

दिल्लीत शेतकरी आंदोलन चिघळलं असताना अशा काळात या शेतकऱ्यांबद्दल बोलण्याऐवजी तू जाहीराती कसल्या करतोस असं नेटकऱ्यांच म्हणणं आहे. शेतकरी आंदोलनावर तू गप्प का असा थेट सवालचं एका युजरने त्याला केला आहे. नुकतीच अक्षयने योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेतली यावरही लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तर आता जाहिरातीवरून नेटकऱ्यांनी त्याला सुनावलं आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास अक्षयकडे १० चित्रपट असल्याचं समजतय. नुकतच त्याने बेलबॉटम चित्रपटाचं शुटींग पुर्ण केलय. सध्या तो पृथ्वीराज च्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर तो अतरंगी रे चं शुटींग करणार आहे आणि त्यानंतर तो बच्चन पांडेच्या शुटींगला सुरूवात करेल.