रविनानंतर अक्षयचं होतं शिल्पा शेट्टीबरोबर अफेअर, ब्रेकअपनंतर लगेचच केलं ट्विंकल खन्नाशी लग्न, शिल्पाने केले गंभीर आरोप!

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची लव्हस्टोरी सुरु झाल्याचे म्हटले जाते. या काळात त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्य.

    बॉलिवूडचा खिलाडी, अभिनेता अक्षय कुमार हा खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असायचा. अक्षयचे नाव हे अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. पण एक दिवस अचानक अक्षयने ट्विंकल खन्नाशी लग्न केले आणि सर्वांना धक्काच बसला. यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी. एका मुलाखतीमध्ये शिल्पाने चक्क अक्षयने तिला फसवले असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता.

    १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची लव्हस्टोरी सुरु झाल्याचे म्हटले जाते. या काळात त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्य. पण २००० मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर अक्षयने २००१ मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केलं.

    शिल्पाने एका मुलाखतीमध्ये अक्षयसोबतच्या अफेअरवर वक्तव्य केले होते. या मुलाखतीमध्ये तिने पहिल्यांदाच अक्षय सोबतच्या अफेअरवर वक्तव्य केले होते. त्यावेळी तिने सांगितले होते की जेव्हा अक्षय तिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होता तेव्हा ट्विंकल खन्नाला देखील डेट करत होता.‘अक्षयने केवळ माझा वापर केला. त्याच्या आयुष्यात जेव्हा दुसरी अभिनेत्री आली तेव्हा त्याने मला सोडून दिले. अक्षय माझ्यासोबत जसा वागला एक दिवस त्याच्यासोबतही तसेच घडेल’ असे शिल्पा म्हणाली होती.