अक्षय कुमारचा काश्मीरमध्ये सैनिकांसोबत डान्स, Video होतोय व्हायरल!

अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अक्षयने हे फोटो शेअर करत लिहिले आहे की, “बीएसएफ सोबत एक अविस्मरणीय दिवस घालवला.

    अभिनेता अक्षय कुमार काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ व्हॅलीमध्ये नियंत्रण रेषेजवळील एका गावात पोहोचला. त्यावेळी अक्षयने बीएसएफ सैनिकांशी संवाद साधला. अक्षय दुपारी बाराच्या सुमारास हेलिकॉप्टरने तिथे पोहोचला. या वेळी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत सैनिक आणि सैन्य अधिकारीही उपस्थित होते. अक्षयने त्यांच्यासोबत डान्सही केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अक्षयने हे फोटो शेअर करत लिहिले आहे की, “बीएसएफ सोबत एक अविस्मरणीय दिवस घालवला. बीएसएफचे सैनिक आज सीमेचे रक्षण करत आहेत. इथे आल्यावर मी नेहमीच विनम्र होतो….या हीरोंना भेटल्यावर माझ्या हृदयात फक्त एक आदर असतो,” अशा आशयाचे ट्वीट अक्षयने केले आहे.

    अक्षय भारतीय सैन्य आणि सैनिकांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे येतो. २०१७ मध्ये त्याने सैनिकांसाठी ‘भारत के वीर’ नावाचा एक उपक्रमसुद्धा सुरू केला. या माध्यमातून देश आणि लोकांच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सैनिक आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कुटूंबियांची मदत केली जाते.