Breaking : अक्षय कुमारच्या आईचं निधन, लेकाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच घेतला अखेरचा श्वास

अरुणा भाटिया यांना वयाशी संबंधित समस्यांमुळे काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना गेल्या ६ दिवसांपासून आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मुलगा अक्षयच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच अरुणा यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारचा वाढदिवस ९ सप्टेंबरला असतो.

  अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे बुधवारी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. अक्षयने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. अक्षयने लिहिले, “ती माझा आधार होती. आणि आज मला असह्य वेदना जाणवत आहेत. माझी आई अरुणा भाटिया आज सकाळी शांततेत या जगाचा निरोप घेऊन माझ्या वडिलांसोबत दुसऱ्या जगात निघून गेली. ” माझ्या आईसाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनेचा मी आदर करतो, ओम शांती.”

  अक्षयच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी आईने घेतला जगाचा निरोप

  अरुणा भाटिया यांना वयाशी संबंधित समस्यांमुळे काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना गेल्या ६ दिवसांपासून आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मुलगा अक्षयच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच अरुणा यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारचा वाढदिवस ९ सप्टेंबरला असतो.

  आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार अचानक ब्रिटनहून परतला. तेथे तो सिंड्रेला चित्रपटाचे शूटिंग करत होता. भारतात आल्यावर त्याने चाहत्यांना त्यांच्या आईच्या आरोग्याबद्दल अपडेट्स दिले आणि लिहिले, “तुम्ही माझ्या आईच्या आरोग्यासाठी व्यक्त केलेली चिंता माझ्या हृदयाला भिडली. मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा खूप कठीण काळ आहे. तुमची प्रत्येक प्रार्थना खूप उपयुक्त ठरेल.”

  बॉलिवूड सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

  अक्षय कुमारच्या आईच्या निधनावर, चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलेब्स देखील तिच्या पोस्टवर कमेंट करून श्रद्धांजली वाहत आहेत. अजय देवगणने लिहिले, “प्रिय अक्की, तुझ्या आईच्या निधनाबद्दल दु:खद संवेदना. अरुणाजींच्या आत्म्याला शांती लाभो. तुला आणि तुझ्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. ओम शांती.”

  अक्षयची फिल्म ‘एयरलिफ्ट’ची सहकलाकार निम्रत कौर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणते, “तुझं खूप मोठं नुकसान झालं आहे. या गंभीर प्रसंगी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हे दु:ख पचविण्याची परमेश्वर शक्ती देवो. सतनाम वाहे गुरु अक्षय।”

  अक्षयच्या प्रोजेक्ट्सचे शुटिंग थांबलेले नाही

  अक्षयने त्याच्या प्रोजेक्ट्सचे काम थांबवले नाही. त्याने निर्मात्यांना त्या दृश्यांचे शुटिंग सुरू ठेवण्यास सांगितले आहे ज्यांना त्याच्या उपस्थितीची आवश्यकता नाही. अक्षय कुमारकडे पुढील वर्षापर्यंत सुमारे अर्धा डझन चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. सुपरस्टारकडे९ प्रोजेक्ट्स आहेत. ८ चित्रपट आणि एक वेब मालिका. बेल बॉटम, सूर्यवंशी, अतरंगी रे, पृथ्वीराज, बच्चन पांडे, रक्षाबंधन, राम सेतू, ओएमजी-ओह माय गॉड 2 आणि वेब सिरीज द एंड यांचा त्यात समावेश आहे.