akshay kumar

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमुळे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची चर्चा रंगली आहे. अक्षय सध्या कामात खूप व्यस्त आहे. अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक सुंदर पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारसोबत कुलभूषण खरबंदा देखील दिसत आहेत

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमुळे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची चर्चा रंगली आहे. अक्षय सध्या कामात खूप व्यस्त आहे. अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक सुंदर पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारसोबत कुलभूषण खरबंदा देखील दिसत आहेत. या फोटोमुळे अक्षय आणखी काय नवीन घेऊन येतोय, याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. पण ही उत्सुकता आता संपली आहे.. तर अक्षय शेअर केलेला फोटो कोणत्या चित्रपटाचा नाही तर जाहीरातीचा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

काय आहे अक्षयच्या पोस्टमध्ये

अक्षयने शेअर केलेल्या पोस्टरवर लिहिले आहे की, ‘ही एका वडिलांची आणि त्यांच्या मुलाची सक्सेस स्टोरी’, तर त्याखाली ‘पापा चले हरिद्वार, बेटा बांटे पगार’, असे लिहले आहे. अक्षय कुमारने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, ‘भारतात ज्या पद्धतीने व्यवसाय केला जातो, तो आता बदलत चालला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

मंगळवारी आदित्यनाथ यांच्याबरोबरची भेट चर्चेत

अक्षय कुमारने मंगळवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती यामुळे बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. उत्तर प्रदेशात फिल्म सिटी तयार करण्याच्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ यांनी अक्षयची भेट घेतली.

बॉलिवूडमध्ये अभिनेता अक्षय कुमारने एक नवा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला होता. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत अक्षयने पहिले स्थान मिळवले होते. फोर्ब्सने अभिनेता अक्षय कुमारला बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता असल्याचे घोषित केले होते. जून 2018 ते 2019 या एका वर्षात अक्षय कुमारने 444 कोटी रुपयांची कमाई केली होती. या शानदार कमाईसोबत अक्षयने आंतरराष्ट्रीय स्टार रेहाना, जॅकी चेन, स्कारलेट जॉनसन आणि ब्रँडली कूपरलाही मागे टाकले होते.