अक्षय टंकसाळेच्या बस्ता चित्रपटातील भूमिकेचं होतय कौतुक, शेतकरी मित्रांनी थोपटली अक्षयची पाठ!

अत्यंत ठेहराव असलेली भूमिका त्यांना या चित्रपटात पाहायला मिळाली अशा प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या. मला शेतकरी मित्रांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या

  मराठी चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका साकारून अभिनेता अक्षय टंकसाळे याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात आणि त्याची अशीच एक भूमिका म्हणजे बस्ता चित्रपटातील मनीषची भूमिका. बस्ता या सुपरहिट चित्रपटात अक्षयने मनीष हि प्रमुख भूमिका निभावली. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २१ मार्च रोजी झी टॉकीजवर होणार आहे. त्यानिमित्ताने चित्रपटाला आणि अक्षयच्या त्यातील भूमिकेला मिळालेल्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना अक्षय म्हणाला, “मी या चित्रपटात मनीष नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे जो अत्यंत साधा, सरळ, गरीब मुलगा आहे. त्याच्या घरची परिस्थिती खूप बेताची आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshay Tanksale (@akshaytanksale)

  तो शेती मात्र अत्यंत मनापासून करतो आणि त्याच गावातील स्वाती नावाच्या मुलीवर त्याचं प्रेम आहे. मला या चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून खूप चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. मी या आधी केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshay Tanksale (@akshaytanksale)

  अत्यंत ठेहराव असलेली भूमिका त्यांना या चित्रपटात पाहायला मिळाली अशा प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या. मला शेतकरी मित्रांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. ते सर्व माझ्या भूमिकेसोबत रिलेट करू शकले असं देखील त्यांनी मला सांगितलं. हि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshay Tanksale (@akshaytanksale)