VIDEO : ‘मला म्हणत्यात हो पुण्याची मैना’ ‘अंजली फेम’ अक्षयाची अस्सल पुणेरी अदाकारी

या मालिकेतील अंजली म्हणजेच पाठकबाईच्या रुपात ती घराघरात पोहोचली होती. या मालिकेने तिला एक नवी ओळख निर्माण करून दिली होती. या मालिकेमुळे ती कित्येकांचा क्रश बनली आहे. तसेच मालिकेतील राणा आणि अंजलीची रांगडी प्रेमकथा चाहत्यांना भुरळ पाडून गेली होती. ही मालिका नेहमीच टीआरपीच्या रेसमध्ये पुढे असायची.

  मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगला’(Tuzat Jiv Rangla) फेम अंजली (Anjali) म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरच्या (Akshya Devdhar) नव्या पोस्टने सर्वांनाचं घायाळ केलं आहे. अक्षयाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक नवा रील शेयर केला आहे. यामध्ये तिचा पारंपरिक अंदाज दिसून येत आहे. अक्षयाच्या मराठमोळ्या अदा पाहून चाहते तिच्यावर लैच फिदा झाले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

  ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर खूपचं लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील अंजली म्हणजेच पाठकबाईच्या रुपात ती घराघरात पोहोचली होती. या मालिकेने तिला एक नवी ओळख निर्माण करून दिली होती. या मालिकेमुळे ती कित्येकांचा क्रश बनली आहे. तसेच मालिकेतील राणा आणि अंजलीची रांगडी प्रेमकथा चाहत्यांना भुरळ पाडून गेली होती. ही मालिका नेहमीच टीआरपीच्या रेसमध्ये पुढे असायची. काही महिन्यांपूर्वीचं मालिकेने निरोप घेतला आहे. मात्र तरीसुद्धा या कालाकरांची क्रेझ कायम आहे.

  मालिकेतील अंजली म्हणजेच अक्षया सोशल मीडियावर खूपचं सक्रिय असते. अक्षया ही मूळची पुण्याची आहे. अक्षयाचा सोशल मीडियावरसुद्धा मोठा चाहता वर्ग आहे. ती सतत नवनवीन पोस्ट शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असतं. अक्षयाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ एक इन्स्टाग्राम रील आहे.

  अक्षयाने ‘मला म्हणत्यात ओ पुण्याची मैना; या ठसकेबाज गाण्यावर रील केला आहे. यामध्ये अक्षया एकदम पारंपरिक अंदाजात दिसून येत आहे. अक्षयाच्या अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. या व्हिडिओवर अक्षयाला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

  akshaya deodhar tuzat jiv rangla fame actress new reel viral on instagram see video