अक्षयच्या ‘बेल बॉटम’चा मुहूर्त ठरला, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

२७ जुलै रोजी 'बेल बॉटम' होणार असून, सध्या तरी लॅाकडाऊननंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट ठरणार आहे.

    कोरोनाचा कहर कमी होत असल्यानं निर्बंध शिथील करण्यात आले असून, लवकरच सिनेमागृहांचे दरवाजेही उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता चित्रपटांच्या प्रदर्शनाचे मुहूर्त निश्चित केले जाऊ लागले आहेत. अभिनयासोबतच समाजकार्यातही आघाडीवर असलेल्या अक्षय कुमारनं इथंही पहिला क्रमांक पटकावला आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अक्षयच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त नक्की करण्यात आला आहे.

    २७ जुलै रोजी ‘बेल बॉटम’ होणार असून, सध्या तरी लॅाकडाऊननंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट ठरणार आहे. अक्षयनं स्वत: ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. ‘बेल बॉटम’च्या प्रदर्शनाची आपण धीरोदात्तपणे प्रतीक्षा केल्याचं आपल्याला ठाऊक असल्याचं अक्षयनं म्हटलं आहे. या घोषणेनंतर अक्षयच्या चाहत्यांसोबतच सिनेमप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसल्याचं चित्र पहायला मिळत आहे. मागील बऱ्याच कालावधीनंतर अक्षयचा मोठा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

    या चित्रपटात अक्षयचं एक नवं रूप प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा १९८०च्या पार्श्वभूमीवर आधारीत असून, अक्षय यात रॅा एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. यातील अक्षयचा लुक लक्ष वेधून घेणारा आहे. यात त्याच्या जोडीला वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि आदिल हुसेन आदी कलाकार आहेत