akshay-kumar

२०० आर्टिस्टसोबत याचं शूटिंग पूर्ण करण्यात येत आहे. यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी प्रोडक्शन हाऊसकडून संपूर्ण एरिया सील करण्यात येणार असल्याचं समजतं.

    ‘बच्चन’ हा शब्द जरी उच्चारला तरी काही तरी भव्य-दिव्य असल्याचा भाव मनात निर्माण होतो इतकं उंची आज या शब्दाला प्राप्त झाली आहे. मागील काही दिवसांपासून हे नाव अक्षय कुमारसोबत जोडलं गेलं आहे. आपल्या कारकिर्दीत नेहमीच ‘बच्चन’गिरी करणारा अक्षय सध्या ‘बच्चन पांडे’ या आगामी हिंदी चित्रपटामुळं चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाचं शूट करत आहे.

    बऱ्याच अडचणींवर यशस्वीपणे मात करत हा चित्रपट अखेर फायनल सीनपर्यंत पोहोचला आहे. मुंबईत शूट झालेल्या या शूटमध्ये अक्षयसोबत क्रिती सॅनोन आणि अर्शद वारसी यांनीही सहभाग घेतला. टायटलप्रमाणेच या चित्रपटात ‘बच्चन’ म्हणजेच अर्थातच भव्य क्लायमॅक्स पहायला मिळणार आहे. २०० आर्टिस्टसोबत याचं शूटिंग पूर्ण करण्यात येत आहे. यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी प्रोडक्शन हाऊसकडून संपूर्ण एरिया सील करण्यात येणार असल्याचं समजतं.

    २०० जणांच्या क्राऊडला सांभाळत सर्वांना सिनेमॅटीक रेंजमध्ये आणण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी कोव्हिडच्या सर्व नियमांचं पालनही करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. २०० आर्टिस्टसोबत अक्षय तीन दिवस क्लायमॅक्स शूट करणार आहे. क्रिती आणि अर्शदचं शूट पूर्ण झालं असून, अक्षयच्या सीनसोबतच ‘बच्चन पांडे’च्या शूटिंगला पूर्णविराम देण्यात येणार आहे.