‘सतत माझ्या आजूबाजूला कोणी तरी असायचं, ते मला स्पर्श करायचे’,अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव!

नुकतीच अलायाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने न्यूयॉर्कमध्ये राहत असतानाचा अनुभव सांगितला आहे.

  जवानी जानेमन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अलाया एफ.जवानी जानेमन. या पहिल्यावहिल्या चित्रपटातून अलायाला एक वेगळी ओळख मिळाली. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भीतीदायक अनुभव सांगितला आहे. नुकतीच अलायाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने न्यूयॉर्कमध्ये राहत असतानाचा अनुभव सांगितला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ALAYA F (@alayaf)

   ‘जेव्हा मी न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा राहात असलेल्या अपार्टमेंटमध्ये मला विचित्र अनुभव आले. मला मध्य रात्री कोणाच्या तरी चालण्याचा आवाज यायचा. कित्येक वेळा माझ्या बाथरुममधील शॉवर अपोआप सुरु व्हायचा. अशा अनेक गोष्टी घडत होत्या. नंतर मला असे वाटले की वीज प्रवाह कमी जास्त होत असल्यामुळे हे सर्व होत आहे.  मला त्यावेळी काही दिसले नव्हते. पण मला सतत माझ्या आजूबाजूला कोणी तरी आहे असा भास व्हायचा. कोणी तरी मला स्पर्श करत आहे असे मला जाणवत होते. काही तरी गडबड असल्याचे मला जाणवले. त्यानंतर मी खूप घाबरले होते. मी त्या घरात परत जाण्यास तयार नव्हते.’

  दरम्यान अलायने लॉकडाउनमुळे काही चित्रपट गमावले असल्याचे देखील सांगितले. काही दिवसांपूर्वी तिचा ‘आज साजेया’ हा म्यूझिक अल्बम लाँच झाला होता. या अल्बमध्ये ती एका नवरीच्या लूकमध्ये दिसत होती.