Alka kubal

देवीची कथा असल्यामुळे अंधश्रध्देकडे जातेय की काय असे प्रेक्षकांना वाटू शकते म्हणून मालिकेच्या सुरूवातीला ही काल्पनिक कथा असल्याचं आम्ही स्पष्ट केलं आहे.

  १. आई माझी काळुबाई या मालिकेनंतर आता चित्रपटात कधी दिसणार?

  – मी लवकरच आगामी ३ चित्रपटांची तयारी सुरू करणार आहे. मार्च, एप्रिलच्या सुमारास या चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरूवात होईल. मी मालिकांपेक्षाही जास्त सिनेमांमध्ये रमते. कदाचीत मी या आधी खूप चित्रपट केल्यामुळे मला मालिकांपेक्षा जास्त चित्रपट करायला आवडतात. आई माझी काळुबाई ही मालिका स्वत:च प्रोडक्शन आणि या मालिकेला महिन्याचे कमी दिवस द्यावे लागत असल्यामुळे मी ही मालिका करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळत आहे.

  २. तुमच्या आगामी चित्रपटात तुमच्या भूमिका काय आहेत?

  – माझ्या या येणाऱ्या तिनही चित्रपटात माझ्या वेगळ्या भूमिका प्रेक्षकांना बघायला मिळतील. मी अशाच वेगळ्या भूमिकांच्या शोधात होते. ‘दिवा पॅसेंजर लोकल’ हा एक चित्रपट आहे. जो कॉमेडी बेस चित्रपट आहे. या चित्रपटात ही खूप वेगळी भूमिका असणार आहे. मी आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळ्या भूमिका करायला मिळाल्या तर मी चित्रपट स्विकारण्याचा निर्णय घेतलाय. ‘धुराळा’ आणि ‘वेडिंगचा’ शिनेमा या चित्रपटाप्रमाणे वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडण्याकडे माझा कल असेल. केवळ परडे मिळतो म्हणून मी काम करत नाही. कमी काम करेन पण चांगलं काम करेन.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

   ३. मालिकेनंतर पुन्हा चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार आहे का?

  या आधी मी पाच चित्रपटांची निर्मिती केली आहे. पण पुन्हा चित्रपटांची निर्मिती करण्याचा वितार नाही. कारण चित्रपटांच्या निर्मितीची गणितं आता बदलली आहेत. आता एका प्रोड्यूसरला एका चित्रपटाची निर्मिती करणं कठीण झालं आहे. मराठी चित्रपटांचे बजेटही आता वाढलं आहे. ५ ते ६ कोटींच्या घरात मराठी सिनेमा गेला आहे. सध्या कोरोनाच्या काळात एवढी मोठी रक्कम गुंतवण धोक्याच आहे. त्यामुळे हिंमत होत नाही पण लवकरच आणखी दोन मालिकांची निर्मिती करणार आहे. त्यातली एक लव्ह स्टोरी आहे आणि एक पौराणिक कथेवर आधारीत मालिका आहे.

  ४.  ‘आई माझी काळुबाई ही मालिका अंधश्रध्देला खतपाणी घालते का? प्रेक्षकांच्या या प्रतिक्रीया आहेत?

  -खूप उत्तम प्रतिसाद मालिकेला प्रेक्षकांनी दिला आहे. आम्हाला खूप फोन,मसेज आले. सोशल मीडियावरही उत्तम प्रतिक्रीया प्रेक्षकांच्या येत असतात. एखाद्या कार्यक्रमाला गेले तर लोक येऊन पाया पडतात. केवळ मोठी माणसं नाही तर एकदी लहान मुलंसुध्दा मालिका बघत असल्याचे अवर्जून येऊन सांगतात. मालिकेतील इतर कलाकारांच्या भूमिकाही प्रेक्षकांना फार आवडत आहेत. आमची मालिका कोणत्याच अंधश्रध्देला खतपाणी घालत नाही. ही एक काल्पनिक कथा आहे. देवीची कथा असल्यामुळे अंधश्रध्देकडे जातेय की काय असे प्रेक्षकांना वाटू शकते म्हणून मालिकेच्या सुरूवातीला ही काल्पनिक कथा असल्याचं आम्ही स्पष्ट केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

  ५. या क्षेत्रात नवीन येणाऱ्या कलाकारांना काय सांगाल?

  – एका कलाकाराने एखादा चित्रपट किंवा मालिका केली की आपण स्टार झालो असे नसते. उलट आपल्यावरची जबाबदारी आणखी वाढते. त्यामुळे तुम्ही जमिनीवर राहणे शिकले पाहिजे. तरच तुमचं कलाकार म्हणून आयुष्य वाढतं. तुमची तुमच्या कामावर श्रध्दा असले. तुम्ही वेळेवर सेटवर येत असाल, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तुमचं करियर कधीच खंडीत होऊ शकत नाही. पण तुमच्या डोक्यात एकदा हवा गेली की इंडस्ट्री असो की प्रेक्षक कोणीच तुम्हाला स्विकारणार नाही. प्रेक्षक डोक्यावर बसवतात पण तितक्याच पटकन खाली उतरवतात. हे नवीन येणाऱ्या कलाकारांनीच केवळ नाही तर सगळ्याच कलाकारांनी लक्षात ठेवायला हवं.