alka yagnik

अलका याज्ञिक(alka yagnik) यांची आई शुभा याज्ञिक या एक शास्त्रीय संगीतकार होत्या.घरातच संगीताचे वातावरण असल्यामुळे अलका(alka yagnik birthday special) यांच्या मनातही संगीताची आवड निर्माण झाली.

    आज प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांचा वाढदिवस(alka yagnik birthday) आहे. या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

    अलका याज्ञिक(alka yagnik) यांची आई शुभा याज्ञिक या एक शास्त्रीय संगीतकार होत्या.घरातच संगीताचे वातावरण असल्यामुळे अलका(alka yagnik birthday special) यांच्या मनातही संगीताची आवड निर्माण झाली. अलका याज्ञिक यांनी ६ वर्षांपासून काम करायला सुरुवात केली. त्यांनी आकाशवाणी कोलकातासाठी गायला सुरुवात केली. त्यांनी ९० च्या दशकामध्ये चित्रपटासाठी गाणी गायला सुरुवात केली.

    अलका १४ किंवा १५ वर्षाच्या असतील तेव्हा त्यांना गाणं गाण्यासाठीचा पहिला ब्रेक मिळाला होता. ‘पायल की झंकार’ या बॉलिवूडमधील चित्रपटासाठी अलका यांनी पहिले गाणे गायले होते. ‘थिरकत अंग लचक झुकी’ हे गाणं त्यानंतर लावारिस चित्रपटातील ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है’ हे गाणं गाण्याची संधी त्यांना मिळाली. लावारिसमधल्या ‘मेरे अंगने मे या गाण्यामुळे अलका खूप लोकप्रिय झाल्या. ही गोष्ट आहे १९८१ सालची. मात्र इतके सुपरहिट गाणे देऊनही अलका यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.त्यांना पुढचे गाणे गायला मिळाले ते थेट १९८८ मध्ये तेही तेजाब चित्रपटामध्ये. तुम्हाला ‘एक दो तीन’ हे माधुरीने डान्स केलेले गाणे आ‌ठवते का? ते अलका यांनीच गायले आहे. या गाण्यानंतर अलका याज्ञिक प्लेबॅक सिंगरच्या रुपात नावारुपाला आल्या.

    अलका यांनी आत्तापर्यंत २०,००० पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. मात्र आता त्यांनी गाणे सोडले आहे. गायनाच्या क्षेत्रामध्ये आलेल्या बदलांमुळे गाणं सोडल्याचं अलका याज्ञिक सांगतात. त्यांच्या मते जशी गाणी ९० च्या दशकात बनायची तशी आता बनताना दिसत नाहीत.

    अलका याज्ञिक यांचे लग्न १९८९ मध्ये झाले होते. गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्या आपला पती नीरज कपूरपासून वेगळ्या राहात आहेत. कारण नीरज कपूर यांचा व्यवसाय शिलॉन्गमध्ये आहे आणि अलका यांचे काम मुंबईमध्ये. नीरज यांनी मुंबईत व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश मिळाले नाही. नीरज शिलॉन्गमध्येच आपले काम करत आहेत.