सई नचिकेतच लग्न मोडण्यात अप्पांना इराची साथ, मालिका पुन्हा एकदा नवीन वळणावर!

आता नाईलाज असलेले सई नचिकेत आपापल्या घरच्यांना २४ तासांची मुदत देतात. या २४ तासात जर अप्पा आणि नचिकेतच्या आईने नचिकेत आणि सईच नातं मान्य करून त्यांच्या लग्नाला परवानगी नाही दिली तर ते दोघं कोर्टात जाऊन लग्न करतील अशी चेतावणी नचिकेत त्यांना देतो.

  झी युवा वाहिनी वरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेमधले नचिकेत आणि सई चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. एकीकडे नचिकेत आणि सई यांच्यातलं प्रेम आणि दुसरीकडे अप्पांचा फॉरेन रिटर्न नचिकेतला असलेला विरोध, नचिकेतची आई आणि सई मधील मतभेत, अप्पा आणि नचिकेतमधल्या नात्यांचे हे चढ उतार तसंच अप्पा आणि नचिकेतच्या आई मधील वाद पाहण्यामध्ये प्रेक्षक चांगलेच गुंतलेत. नुकतंच या मालिकेत इरा म्हणजेच नचिकेतच्या आईची एंट्री झाली आणि मालिकेने वेगळंच वळण घेतलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

  याआधी नचिकेत आणि सईच्या नात्याला फक्त अप्पांचा विरोध होता पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियात स्थायिक आणि मॉडर्न विचार असलेली नचिकेतची आई जेव्हा टिपिकल मराठी कुटुंबात वाढलेल्या सईला पाहते तेव्हा तिचाही नचिकेत आणि सईच्या नात्याला नकार ठाम होतो.नचिकेतच्या आईला इम्प्रेस करण्यासाठी सई आणि अप्पांचं मन जिंकण्यासाठी नचिकेत खूप प्रयत्न करतात पण शेवटी दोघांचाही नकार मात्र कायमच आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

  आता नाईलाज असलेले सई नचिकेत आपापल्या घरच्यांना २४ तासांची मुदत देतात. या २४ तासात जर अप्पा आणि नचिकेतच्या आईने नचिकेत आणि सईच नातं मान्य करून त्यांच्या लग्नाला परवानगी नाही दिली तर ते दोघं कोर्टात जाऊन लग्न करतील अशी चेतावणी नचिकेत त्यांना देतो. पण हार मानतील ते अप्पा कसले? अप्पा आणि इरा मिळून नचिकेत आणि सईच लग्न मोडण्याचा डाव आखत आहेत. त्यांनी कोर्टात जाऊन लग्न करू नये म्हणून अप्पा आणि इरा, सई आणि नचिकेतच नातं त्यांना मान्य असल्याचं सगळ्यांसमोर खोटं बोलतात.

  हे खोटं बोलून ते सई आणि नचिकेतला कोर्टात जाऊन लग्न करण्यापासून थांबवून त्यांच्यात भांडण लावून त्यांचं नातं कसं तोडता येईल याचं प्लॅनिंग करतात आहेत. इरा सईला सोन्याच्या बांगड्या भेट म्हणून देते आणि अप्पांना त्या सई घरी आल्यावर लपवून ठेवायला सांगते जेणेकरून नचिकेतच्या आईने भेट म्हणून दिलेल्या बांगड्या सईच्या हलगर्जीपणामुळे हरवल्या यावरून त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होईल. पण खरंच अप्पा आणि इराचा हा प्लॅन यशस्वी होईल का? सई आणि नचिकेतला कळेल का कि अप्पा आणि इरा यांनी त्यांचं लग्न मोडण्यासाठी हातमिळवणी केली आहे? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.